
क्रिकेटचं चांगभल....???
गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपेक्षा त्यातल्या "कोटींची" चर्चा वाचून / पाहून बरेच विचार मनात येताहेत. आयपीएल नामक क्रिकेट-व्यापार आता सूरू झाला आहे. खर पाहिलं तर व्यापार हा समाजाच्या भरभराटीचा निर्द्शक समजला जातो. नफा कमावण्याचा मुख्यहेतू असुनही, रोजगार निर्मिती, क्षेत्रिय विकास, सामाजीक व पर्यावरणाचा विकास इत्यादि हेतू साध्य करायचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवायचे अभिप्रेत असते.
आयपीएल क्रिकेट-व्यापार काय साध्य करेल ?
क्रिकेटची प्रगती ? - क्रिकेट तज्ञच या बद्दल साशंक आहेत. आपण काय लिहीणार?
नफा - गुळा भोवती मुंगळे जमावे तसे विवीध कंपन्या, चित्रपट तारे-तारकांच्या पडलेल्या उड्या पाहून अंदाज येतोच. खेळाडूंचे मात्र नक्कीच भले (!) होईलसे दिसते.
रोजगार- नगण्य फरक पडेल.
समाज - २०-२० च्या या "कोंबड्यांच्या झुंजी" यशस्वी होण्याकरता समाजाचा मोठा सहभाग अत्यावश्यक आहे ! गर्दी खेचण्यासाठी हर तर्हेचे प्रयत्न केले जातील. याची झलक आपण सगळ्यांनी या आधीच्या सामन्यांमधे अनुभवली आहे. एवढ्यामोठ्या खर्चा वरचा दामदुप्पट परतावा किमान अपेक्षित राहील ! तो कसा काढणार व कोण देणार ?! माझ्या मते जाहिरात हे एकमेव आवक स्त्रोत असल्याने सर्व भडिमार त्यावरच राहाणार. त्यातही दूरदर्शन फारच महत्त्वाचा ठरेल. टीआरपी " कमावण्याचे " अभूतपूर्व प्रयत्न पाहायला मिळतील. जाहिरातींचे दर अस्मानाला भिड्ल्यास आश्चर्य वाटायला नको. .........
मित्रहो जाहीरातींचा हा खर्च आपण सर्व उत्पादनांच्या वाढीव किमती देवून उचलणार आहोत !!! चहा, कॉफी,तेल,मिठ, आटा, साबण, ई. रोज लागणार्या वस्तू, इंश्युरन्स, ब्यांका, फोन, आदि. नियमित लागणार्या सेवा, चित्रवाणी संच, धुलाई यंत्र, ई. ग्राहकोपयोगी वस्तू ...... यादी तुम्ही वाढवू शकता.
तर मित्रहो तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा कारण आपल्या सगळ्यांना मुकेशभाई, शाहरुखभाई, प्रितीताईं ईत्यादींना ( आणि हो शरदभाऊ राहिलेच) क्रिकेट्च भलं करायला मदत करायची आहे.
बघा पटतं का ? :-)
दत्तात्रय निकम
क्रिकेटप्रेमी आणि
व्यवसायाने अभियंता (उपकरनिकरण )
0 Comments