

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा एखाद्या झंझावातापेक्षा कमी नव्हता.मैदानात खेळ आणि बाहेर वादाची वावटळे उठत होती.पण भारताने ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन फायनलमध्ये नमवले आणि त्यानंतर केलेल्या स्फोटक जल्लोषानंतर हे वादळ आता थांबलेले वाटते.त्यामुळेआता या दौयाचेसिंहावलोक केले असता आपल्याला असे दिसते की या दौयात भारताने हळूच शिवधनुष्य उचलल्याचा पराक्रम केला आहे.

सचिनचा पुनर्जन्म
सचिनच्या दृष्टीने हा दौरा अविस्मरणीय झाला असेल पण सर्व क्रिकेट रसिकांच्या मते हा त्याचा पुनर्जन्म आहे. या दौ-यात त्याने त्याच्या फलंदाजी संदर्भात गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांना आपल्या खेळाने एकदाचे उत्तर दिले आहे. आता पुढील एक दोन मालिकांपर्यंत त्याच्याकडे बोट दाखवण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. कसोटी सामन्यात त्याने सिडनी आणि अॅडलेडमध्ये शतकं ठोकली.

तर वन डे मध्ये अंतिम सामन्यात त्याने मोठी धावसंख्या उभारली. त्याला पूर्वीची शैली प्राप्त झाल्याच्या आर्विभावात त्याची खेळी होती. त्यानंतर त्याने तब्बल तीन वर्षांनंतर अव्वल स्थान पटकावले.
कांगारूंचे पतन

ऑस्ट्रेलिया संघाचा खेळात आणि नैतिक दृष्ट्या पराभव झाला आहे. हॉग , मायकल क्लार्क , सायमंड , हेडन आणि कर्णधार पाँटिंग यांची मैदानातील वर्तणूक नैतिकतेला सोडून होती. या उलट अनिल कुंबळे , सचिन तेंडुलकर , महेंद्रसिंग ढोणी हे मर्यादेत राहून आपला मान वाढवला आहे.
गोलंदाजांची नवी ब्रिगेड
भारतीय संघ हा आपल्या फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत अनेक सामने जिंकला आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळताना भारतीय गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली आहे.

यात मिडिअम पेसरने चांगलीच कमाल केली. ईशांत शर्मा आणि प्रविण कुमार या दौ-यातील एक शोध आहे. श्रीशांत आणि इरफान पठाण प्रभावी ठरले नाही. पण मुनाफ पटेल. झहीर खान आणि आर. पी. सिंग यांची गणना केली तर भारताकडे आता अर्धा डझनपेक्षा अधिक जलदगती गोलंदाज आहे.
जगज्जेते आले होSSS!
ते येणार म्हणून काल रात्रीच सगळी तयारी झाली होती... आज सकाळी तर प्रत्येकाच्या नजरा त्यांच्या वाटेकडे लागल्या होत्या... सकाळी ११ वाजल्यापासून दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करायला प्रत्येक क्रिकेटप्रेमी आतूर होता... अलोट गर्दी लोटली होती... आणि अखेर , दुपारी अडीच वाजता ते आले.... ते कोण ?

.. अहो , ते म्हणजे जगज्जेते... महेंद्रसिंग ढोणीची टीम इंडिया... आपली लाडकी टीम इंडिया...
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात लोळवून ते परत आले होते , म्हणून ते जगज्जेते... ते आले आणि दिल्लीत एकच नारा घुमला , ' चक दे इंडिया ' ...फिरोजशाह कोटला मैदानावर ही टीम अवतरली तेव्हा जणू ' तारें जमीं पर ' उतरल्याचीच अनुभूती आली.
ब्रिस्बेनमध्ये गाबा मैदानावर दुसरा अंतिम सामनाही जिंकून भारतानं मालिका खिशात घातली आणि विक्रम रचला. तिरंगी मालिकेत कांगारुंना त्यांच्याच देशात आजवर कुणीच हरवलं नव्हतं , तो पराक्रम ढोणीच्या टीम इंडियानं करून दाखवला आणि देशभरात दिवाळी साजरी झाली.. कुणाच्याच आनंदाला पारावर नव्हता. कधी एकदा आपले सगळे हिरो परत येतात आणि त्यांना याचि देहि याची डोळा पाहतो , अशी उत्कंठा सगळ्यांना लागली होती. त्यांची ही प्रतीक्षा अखेर आज संपली.. मेन इन ब्ल्यू , टीम इंडिया आधी मुंबईत आणि नंतर दिल्लीत प्रकटली तेव्हा सगळ्या खेळाडूंच्या विजयी मुद्रा आपल्या डोळ्यात , कॅमे-यात किंवा मोबाइलमध्ये साठवून घेण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न होता...
मुंबई विमानतळावर ते फार काळ थांबले नाहीत. पण , त्या छोट्याशा भेटीतही २०-२० विश्वचषक जिंकून आल्यावर त्यांचं झालेलं स्वागत प्रत्येक खेळाडूला आठवलं असेल. त्यांचं तसंच स्वागत आज दिल्लीत होणार होतं. मुंबईत जशी निलांबरी सजली होती , तशीच एक आलिशान बस दिल्लीत या विक्रमवीरांची वाट पाहत होती... वानखेडेसारखंच फिरोजशाह कोटला मैदानही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतं.. आणि हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी खेळाडूही आतूर झाले होते.... दोन दिवस आपण धड झोपलेलो नाही , त्याचा जराही लवलेश त्यांच्या चेह-यावर दिसत नव्हता.. होता तो फक्त आनंद आणि जल्लोष...
सुरुवातीला त्यांनी प्रस्थान केलं इंटरकॉन्टिनेन्टलकडे... तिथे त्यांच्यासाठी शाही खाना ठेवण्यात आला होता... जो जे वांछिल तो ते लाहो , अशी सगळी चोख व्यवस्था शेफनी करून ठेवली होती.. त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन , थोडासा आराम करून हे सगळे खेळाडू निघाले , फिरोजशाह कोटला मैदानाकडे.. पण आज ते मॅच खेळायला चालले नव्हते.. ते निघाले होते एक अविस्मरणीय सोहळा अनुभवायला...
कोटला मैदानावर त्यांचं स्वागत झालं , ढोल-ताश्यांच्या गजरात... तिथे गाणी सुरू होती , डान्स सुरू होता , भज्जीसाठी भांगडाही होता आणि चक दे इंडिया हे गाणं सगळ्यांचाच जोश वाढवत होतं.. बीसीसीआयचे सगळे पदाधिकारी मैदानावर हजर होते.. क्रिकेटचाहत्यांच्या गर्दीला तर उपमाच नव्हती. मग एकेका खेळाडूचं नाव पुकारण्यात आलं आणि त्यांच्यावर झाली बक्षिसांची खैरात... त्यांनी पराक्रमच तसा केला होता.. जगज्जेत्यांचा माज उतरवणं सोपी गोष्ट नव्हती.. चार महिन्याच्या दौ-यात झालेल्या अपमानाची सव्याज परतफेड त्यांनी केली होती.. म्हणूनच भारतीयांसाठी ते ठरले जगज्जेते आणि त्यांनी जयघोष केला , कम ऑन इंडिया !
मराठी बॅटिंग अन् भैयाची बॉलिंग... चक दे इंडिया
वर्ल्ड चॅम्पिअन ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मातीत माज उतरवून तिरंगी मालिका जिंकण्याचा, आजवर कुणालाच न जमलेला विक्रम आपण केला खरा, पण कोणाच्या जीवावर... मराठमोळ्या सचिनने तुफान ९१ धावा कुटल्या आणि युपीच्या प्रवीणकुमारने ऐन मोक्याच्या क्षणी चार महत्त्वाचे बळी घेतले... अन्यथा हा विजय शक्यच नव्हता, तेव्हा चक दे इंडिया !
सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा राडा पेटला आहे. त्याचा जाळ कमी झाला असला तरी आग अजून धुमसतेय. या राड्याचे पडसाद केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले नसून संसदेतही त्याचा आवाज घुमतोय. अशा पार्श्वभूमीवर आजचा हा विजय जरा वेगळ्या कोनातून बघितला तर भारताच्या ‘ विविधतेतून ’ संस्कृतीचे आगळेच चित्र सामोरे येते.
खरं तर ही मालिका खेळापेक्षा जास्त गाजली ती कांगारूंच्या कांगाव्यामुळे. वाटेल ते आरोप आणि पक्षपातीपणाचा फायदा उठवत माजोरड्या कांगारूंनी जरा जास्तच भाव खाल्ला. पण त्यांचा हा सारा माज भारताने ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर भूईसपाट केला. या यशात जेवढा टीम इंडियाचा वाटा आहे, त्याहून अधिक श्रेय सचिन आणि प्रवीणकुमार या जोडगोळीचे आहे.
काही सामन्यांपूर्वीच सचिनवर टीकेचे माहोळ उठले होते. ‘ सिनिअर जबाबदारीने खेळत नाहीत ,’ अशी आडूनआडून टीका दस्तरखूद्द कर्णधार ढोणीनेच केली होती. त्याच्या या बेलगाम टीकेची री संजय मांजरेकर आणि सुनील गावस्कर या मराठी वीरांनीही ओढली होती.

पण सचिन तोंडाने नाही बॅटने बोलतो हे त्याने सिडनीत नाबाद ११७ आणि ब्रिस्बेनमध्ये ९१ धावांना फटकावून दाखवून दिले.


प्रवीणकुमार या उत्तर प्रदेशातील गुणी बॉलरने गिलक्रिस्ट, पॉंटिंग, क्लार्क आणि ब्रेट ली यांना तंबूत पाठवून भारताचा विजय सोपा केला.
मोठ्यांची धमाल छोटयॉचि कमाल !

क्वालालंपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारुन युवा (१९ वर्षांखालील) र्वल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे बेंगळुरूमध्ये जंगी स्वागत झाले. खेळाडूंच्या स्वागतासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार, विजय मल्या, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला तसेच कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे चिटणीस ब्रिजेश पटेल यांनी विमानतळावर आवर्जुन हजेरी लावली होती. शेकडो क्रिकेट चाहत्यांनीही र्वल्ड कप हिरोंना पाहायला गदीर् केली होती. फुले, बॅनर्स व फुग्यांनी सजलेल्या ओपन बसमध्ये युवा भारतीय शिलेदार ऐटीत उभे होते. चाहत्यांनी त्यांना पुष्पगुच्छ, ग्रीटिंग कार्ड भेट दिली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम लढत सुरू असूनही बेंगळुरूवासियांनी रस्ते व चिन्नास्वामी स्टेडियमवर गदीर् केली होती हे विशेष.

आठ वर्षांनंतर युवा क्रिकेट (१९ वर्षांखालील) र्वल्ड कप जिंकण्याची करामत करणाऱ्या भारतीय संघाचे बेंगळुरूत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. २०-२० क्रिकेट र्वल्ड कप जिंकल्यावर महेंदसिंग ढोणीच्या संघाची खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच स्वागत विराट कोहलीच्या युवा संघाचेही होईल. बेंगळुरू विमानतळ ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत खेळाडूंची खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सल्ला... सचिन तेंडुलकरचा
विजयाचा जल्लोस तर हवाच त्याबोबार एक गोस्ट लक्षात ठेवा तुम्ही खुप चांगले खेळलात अणि खेळत राहा. पण प्रत्येक गोष्टी साठी एक ठरलेली वेळ असते वर्ल्ड चैम्पियन एका दिवसात बनता येत नाही तर थोड़े थांबा आणि मग पुढे चला
आपला,
दत्त्तात्रय निकम
1 Comments
>> तिरंगी मालिकेत कांगारुंना त्यांच्याच देशात आजवर कुणीच हरवलं नव्हतं
ReplyDeleteनिकम, म.टा.च्या बातम्या टाकत जाऊ नका, गंडलेले लोक आहेत ते. मागच्या वर्षी नाही का england ने याच CB Series मध्ये त्यांना हरवले होते...सलग दोन finals मध्येच!