II नाद II
काय तो बंडया अणि काय त्याचा नाद
त्यावरुन घरात होतात नेहमीच वाद
धड़ त्याला समजत नाही, समजवाताही येत नाही
त्याला चांगले कधी उमगेल का ?
आयुष्यात तो कही करू शकेल का ?
काय तो बंडया अणि काय त्याचा नाद
त्यावरुन घरात होतात नेहमीच वाद
बंडयाचे कोड आम्हाला नाही सुटत
शाळेत बंडयाला गणित मात्र नाही जमत
नियमित घरी करतो गृहपाठ
पण तरीही परिक्षेत मात्र भूईसपाट
त्याला वाचनाचा नाद लई भारी
का ? कुणास ठावुक ? लिहिताना होई दैना भारी
काय तो बंडया अणि काय त्याचा नाद
त्यावरुन घरात होतात नेहमीच वाद
बंडया ! करी थोराचा खुप आदर
काही सांगितले की दाखवतो लगेच दादर
प्रत्येकाच्या आयुष्यात असावा काहीतरी ध्यास
पण ह्याला नको मात्र कडिचाही त्रास
काय तो बंडया अणि काय त्याचा नाद
त्यावरुन घरात होतात नेहमीच वाद
त्यालाही आयुष्यात काहीतरी करायचे आहे
पण त्याला विचार फक्त एकच
न कही करता वर कसं यायचं
काय तो बंडया अणि काय त्याचा नाद
त्यावरुन घरात होतात नेहमीच वाद
गुरूजी म्हणतात मुलगा शाळेत कंटाळी
आई सांगते बंडया ! आता तरी तू हे टाळी
शेजारचे म्हणतात तुमचा बंडया फार अवकळ
बंडया म्हणतो ये काकू करू नको कळकळ
बंडयाला हौस भारी स्वप्न बघयाची
झोपेतून उठावाल्यावर रडत बसयाची
काय तो बंडया अणि काय त्याचा नाद
त्यावरुन घरात होतात नेहमीच वाद
बाबांनी ठराविले भेताय्चे त्याचा सवंगडे
भेटल्यावर कळालें सगालेच विचारंचे लंगडे
बंडया म्हणतो डोंट वरी मी होईन अँक्ट्र्र
काका म्हणतात बंडया आमचा खुप चप्टर
काय तो बंडया अणि काय त्याचा नाद
त्यावरुन घरात होतात नेहमीच वाद
बंडयासाठी आई-बाबा खुप परेशान
बंडया म्हणतो मी राखींन तुमची शान
बंडयाला वाटते आयुष्यात मारायची आहे भरारी
जर नाही जमले तर चलावायची गाड़ी फरारी
काय तो बंडया अणि काय त्याचा नाद
त्यावरुन घरात होतात नेहमीच वाद

नव् कवी
दत्तात्रय निकम
मी मराठी
1 Comments
छान आहे, पण हा बंड्या कोण आहे हो!
ReplyDelete