कितीही दूर गेलं तरी पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात

कितीही दूर गेलं तरी पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात

विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं

मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं

वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात

काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत


हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो........Nothing Special yaar............

Dattatray Nikam

Post a Comment

0 Comments