सांगा कस जगायचं.....? " आपले महाराष्ट्र मंडळ "
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!
कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!
पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही

पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं
मात्रुभूमि सोडली की

आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं
वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात
काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत

या मजबूत रेशीम गाठी आहेत.........
सांगा आता .............
का कुणास ठावुक वाटते मनात हुरहुर !
वाटते उडून जावे भुर भुर...
सांगा आता .............
ह्या विदेशी दुनियेत लोकाही जगतात . !
पण काय ! काय ! करून राहतात ..
नाही कुणाला कोणासाठी तळमळ ...
जेव्हा पोहचते ! झळ ! झळ !....
तेव्हा जाणवते ककळकळ .....
काय करावे ! म्हणुन होते धावपळ.....
उपाय फक्त ! एकच " आपले महाराष्ट्र मंडळ "......
आपला ,
मी मराठी
दत्तात्रय निकम
0 Comments