नमस्कार मित्रांनो!
आजच्या आपल्या सदरात कळवा पॅशन हा विषय बनवला आहे आणि त्याची माहिती देणारा हा लेख आहे.
आपुष्यात प्रत्येकजण एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून जगत असतात, याबद्दल आपले विचार काय आहेत हे सुध्दा जाणून घ्यायला आवडेल ते तूम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.
ही गोष्ट आहे माझ्या येत्या काळात येणाऱ्या नवीन ई बूक ची आणि हा वेगळा विषय एका अनुभवावरून लिहावा असे मनोमनी वाटले. माझे हे ई बुक आपले ई साहित्य मराठी भाषा वेब साईट वर येणार आहेत. ई साहित्य असे नवीन नवीन विषय आणि नवीन लेखकांना प्रोत्साहन देत त्याच्या विचारांचा संग्रह प्रकाशित करण्यासाठी खुप खूप प्रयत्नशील असतात.
माझे ई साहित्य बरोबर हे पाचवे ई बुक आहे, ती यादी पुढीप्रमाणे आहे.
१. समज गैरसमज
२. प्रवास आणि परिचय - पासपोर्ट आठवणींचा
३. मॅझिक वर्ड - inspiring thoughts
४. गड किल्ले - साम्राज्य शिवरायांचे
मी काही तरी नवीन लिहिण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो आणि त्यातून आपल्याला सुध्दा जगण्याची प्रेरणा मिळते. मला स्वतः ल २४ तास, सात दिवस एकच गोष्ट करून माझे मौल्यावान वेळ आणि आयुष्य एक रूटीन लाईफ म्हणून जगायचे नाही. मुळात मी लहानपणापासून लिहिणे, वाचणे आणि विविध गोष्टी करणे मला आवडते, कदाचित हीच माझी पॅशन तर नसेल ना. हा विषय मस्त रंगणार आहे.
पॅशन म्हणजे नक्की काय?
एखादी गोष्ट करण्यासाठी तूम्ही नेहमीच तयार असता. ती करताना तुम्हाला त्याचा किती फायदा होईल किंवा मग मग वेळेचं नियोजन करणे किंवा तुमचे प्रोफेशनल जीवन याचा या सर्व गोष्टींचा तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टीवर याचा काहीच परिणाम होत नाही. याऊलट यासर्व गोष्टी सांभाळून तुम्ही तुमची आवड जपता यालाच तर पॅशन म्हणतात.
मग कळवा पॅशनच का?
माझे बालपण मुंबई माझगाव येथे गेले आणि २०१० सालापासून मी कळवा येथे राहत आहे आणि हीच माझी कर्मभूमी आहे. माझ्या १३ वर्षाच्या प्रवासात मी अशा विविध गोष्टी पाहिल्या ज्या प्रामुख्याने मला माझ्या बालपणात करता आल्या.
मला वाटते कळव्यामध्ये आपणास खुप प्रतिभावान व्यक्तिमत्वे आहे आणि त्यांची ओळख सर्वांनी व्हावी म्हणून आपले कळवा.
हा विषय लिहिण्याचा उद्देश काय?
हल्ली कसे झाले आहे ना की प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात मध्ये इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःच्या मनाचा, आवडीचा विचार सुध्दा करता येत नाही कारणे काहीही असू शकतात. पण कोरोना काळानंतर बऱ्याच प्रमाणात लोकांना समजले आहे की जीवन खुप सोपे आहे आणि जीवनशैली खूप महाग आहे. या सर्वांचा विचार विचार करून आपण सर्वजण मिळून कळव्यातील अशा प्रतिभावंत व्यक्तींचा समावेश केला आहे, ज्याने करून आपल्या कळवेकर म्हणून मदत होईल म्हणून हा विषय, यातून आपण आपली पॅशन कशी ओळखायची, कसे प्रयत्न करायचे आणि मस्त जीवनाचा आनंद घेत राहणे.
आपला हा विषय कळवा येथे राहून आपल्या कळवा परिसराचे नाव जगात पोहविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि एक परंपरा सुरू ठेवली आहे, त्याचा एक सारांश म्हणजे आपले हे पुस्तक. " कळवा पॅशन! परंपरा कळव्याची.. अभिमान आपला! "
या सदरात मी स्वतः तीन महिने विवध लोकांना भेटून माहिती गोळा करून त्यातून आपल्याला या पॅशनेट लोकांबद्दल जाणून घ्यायला पाहिजे असे वाटले. प्रामुख्याने मला त्यांचे कार्य तसेच त्यांनी त्यांची पॅशन जपणे आणि बाकी सर्व गोष्टींचा समतोल राखण्यासाठी केलेले प्रयत्न यातून जाणवतील.
ई बुक मधील माहिती खालील प्रमाणे विभागली आहे.
१. फिटनेस आयकॉन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे दांपत्य
२. आवडीची निवड - मोहीम सायकलिंगची
३. दृढनिश्चय आंतरराष्ट्रीय कराटेपटू
४. शिष्टाचार मावळ्याचा - प्रदक्षिणा गड किल्ल्यांची
वरील विषय धरून लिखाण करताना खुप मजा आली हे सर्व अनुभव ऐकताना मला स्वतः या प्रवासाचा आनंद घेता आला. या विषयावर एक छोटासा प्रयत्न म्हणून व्हिडिओ बनवला आहे तो सोबत जोडत आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि बघा.
आपणास आजचा आपला विषय कळवा पॅशन कसा काय वाटला ते आम्हाला जरूर कळवा. कॉमेंट करा, पोस्ट वर सुध्दा आपण कॉमेंट करू शकता.
असेच नवीन नवीन विषय आम्ही आपल्यासाठी नेहमी घेवून येत राहू. चांगले वाचा ! चांगला विचार करा! तुमचे सुध्दा चांगले होवो हीच माझी प्रार्थना.
धन्यवाद,
मी मराठी
दत्तात्रय कृष्णा निकम
0 Comments