भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आतापर्यंत जे काही मोहिम हाती घेतल्या होत्या. त्या प्रकरपणे पार पाडल्या जसे की, मंगल यान ,चंद्रयान 1,चंद्रयान 2, या मोहीम भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) पार पाडल्या आहेत. परंतु चंद्रयान 2 चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चंद्रयान दोन ही मोहीम अपूर्ण राहिली होती. परंतु आता भारताने चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे. 

मंगळयान

मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.

मंगळकक्षा

मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणतः ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल.


चंद्रयान-१

  • भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरिया मधील ११ वैज्ञानिक उपकरणे चंद्राच्या रासायनिक, खनिज शास्त्रीय आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी ही अंतराळयान मोहीम होती. 
  • मोहिमेतील सर्व महत्त्वाच्या बाबी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर मे २००९ मध्ये ही कक्षा २०० किलोमीटर पर्यंत वाढविण्यात आली. 
  • या उपग्रहाने चंद्राभोवती ३४०० हून अधिक प्रदक्षिणा घातल्या. या मोहिमेचा कालावधी दोन वर्षांचा होता. 
  • २९ ऑगस्ट २००९ रोजी यानाशी संपर्क तुटल्याने ती अकाली रद्द करण्यात आली होती. 





मोहिमेचा प्रकार : प्रदक्षिणा मारणारा उपग्रह
प्रक्षेपण दिन : ऑक्टोबर २२, इ.स. २००८- श्रीहरिकोटा, भारत येथून
प्रक्षेपण वाहन : पी.एस.एल.व्ही.-सी११

चांद्रयान २

  • चांद्रयान २ ही मोहीम चांद्रयान १ नंतरची भारताची दुसरी चांद्रमोहीम आहे. हे यान इस्रोने बनवले.  
  • २२ जुलै, २०१९ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1) द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. 
  • या यानात कक्षा भ्रमर (Orbiter), लॅंडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश असून हे सगळे भारतात विकसित करण्यात आले आहेत.
  • 'इस्रो ची  महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या 'चांद्रयान - २'च्या अखेरच्या टप्प्यात चंद्र भूमीपासून केवळ २.१ कि.मी. उंचीवर. 
  • ८ सप्टेंबर २०१९ - विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर देशभरातील खगोल प्रेमींमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले..


मोहिमेचा प्रकार : चंद्राच्या भू रचनेचा, तिथल्या खनिजांचा व बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे
प्रक्षेपण दिन : २२ जुलै २०१९, श्रीहरिकोटा, भारत येथून
प्रक्षेपण वाहन : प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1) 

चांद्रयान 

  • चंद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन गेले.
  • २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इसरोने नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले. पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले.
  • लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले. या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनला.


इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
  • चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.
  • चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक.
  • चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण. इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.
अशा प्रकारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) एक जागतिक विक्रम " सॉफ्ट लँडिंग ऑफ चांद्रयान -३" करून भारताचे नाव दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश बनविला. 

तसेच या अभियानाचा भाग म्हणून दत्तात्रय निकम क्रिएशन वर एक छोटासा व्हिडिओ बनविलेला आहे तो आपणासाठी सादर करीत आहे. आपला अभिप्राय कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा. 

सर्व शास्त्रज्ञ, टेक्निशियन व इंजिनीअर यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. 
आपला,
मी मराठी ,
दत्तात्रय निकम 


Post a Comment

0 Comments