!! गणपती बाप्पा मोरया -२०२३ !! Ganapati Bappa Morya - 2023

!! गणपती बाप्पा मोरया -२०२३ !!

 नमस्कार मंडळी !
दरवर्षी प्रमाणे यावर्षी -२०२३ ला सुध्दा गणपती बाप्पा व गौरी माता पूजन करुन, त्यांची आम्ही सर्वांनी मनोभावें सेवा करुन काल त्यांना निरोप दिला.
#गणपती #बाप्पामाझा



गणपती बाप्पा सजावट उद्देश
तसेच या वर्षीची सजावट करताना आम्ही #प्रयत्नपर्यावरणरक्षणाचा ही संकल्पना ठेवली होती. कारण गेली तीन वर्ष आम्ही पारसिक हिल्स प्लांटेशन च्या "झाडे लावा ! झाडे जगवा!" या मोहिमेत सहभागी होवून वृक्ष संवर्धन करुन निसर्गाच्या प्रती - निसर्ग रक्षणासाठी प्रयत्न करीत आहोत.

या मुळे घरातील बच्चे कंपनीचा उत्साह खूप होता. मुख्यत्वे मानस आणि मी दोघांनी या वेळी ऑफिस मधील पोस्टर चित्रकला स्पर्धेत भाग घेवून Sustainability (टिकाव) या विषयवार पोस्टर बनविले होते. खास करून मानस या संकल्पनेसाठी उत्साही होता म्हणून आम्ही आमच्या घरच्या गणपती बाप्पा सजावटीसाठी हा विषय निवडला.






सजावट संकल्पना

याचाच संदर्भ घेवून Sustainability (टिकाव) ची सजावट घरच्या गणपती बाप्पा साठी ठेवली होती. यामध्ये प्रामुख्याने Non Renewable Energy ( पारंपारिक ऊर्जा)Renewable Energy (अपारंपारिक ऊर्जा/ अक्षय ऊर्जा) यांची स्तोत्र मांडणी केली होती. त्यानुसार आम्ही सर्वांनी प्रयत्न करून बाप्पा दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना या बद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केला.

















या वर्षीच्या गणपती बाप्पा म्हणजे "गणपती बाप्पा मोरया ! परंपरा निकम परिवाराची ! " या व्हिडीओ मध्ये आपण संपूर्ण माहिती पाहू शकता.

आशिर्वाद गणपती बाप्पाचा

या मध्ये प्रामुख्याने चि. शुभम व चि. मानस यांनी या संकल्पनेसाठी मला मदत केली त्याची पोचपावती म्हणून या वर्षी आम्हाला दोन स्पर्धांमध्ये नामांकन मिळाले. या वर्षीची सजावट संकल्पनेचे कौतुक व प्रशंसा म्हणून खालील सन्मान मिळाले .
१. Ganapati.tv यांच्या घरचा गणपती सजावट स्पर्धेत आमच्या बाप्पा व सजावटीचे फोटोस निवडले गेले आणि त्याचे e-certificate of Appreciation सुध्दा आम्हाला ईमेल द्वारे मिळाले व अंतिम निकाल १० ऑक्टोबर २०२३ जा जाहीर होईल.
गणपती बाप्पा मोरया - २०२३

































२. संघर्ष आयोजित "आमचा बाप्पा सर्वात छान" श्री गणेश आरास सजावट स्पर्धा २०२३ मध्ये आमच्या बाप्पा व सजावटीला उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून गणपती बाप्पा मूर्ती व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.



















३. तिसऱ्या स्पर्धेचे निकाल अजून बाकी आहेत.

ध्येयपूर्ती

आम्हाला या वर्षीची सजावट करताना पारसिक हिल्स प्लांटेशन ग्रुप (PHPG) ची ध्येय व उद्दिष्ट्ये याची खूप मदत झाली. तसेच आम्हाला पारसिक हिल्स प्लांटेशन ग्रुप (PHPG) चे कार्य लोकांना अभिमानाने सांगता आले आणि PHPG विनामूल्य प्लेट बँक उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक संधी मिळाली. आपल्या पारसिक हिल्स च्या कामाची भरपूर लोकांनी प्रशंसा केली आणि असेच चांगले कार्य करत रहा यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.
आज आपण सर्वानी मिळून पारसिक हिल्स प्लांटेशनची जी मोहीम सुरु केली आहे, ती अशीच पुढे चालू ठेऊन त्यातून वृक्ष संवर्धन करून निसर्गाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत रहायचे आहे. आपल्या बरोबर या मोहिमेत अजून काही सभासदांना जोडता आले तर उत्तम होईल, त्यादृष्टीने आपण सर्वानी प्रयत्न करूया.
पारसिक हिल्स प्लांटेशन ग्रुप (PHPG) चे धन्यवाद व आभार !

आपला,
दत्तात्रय कृष्णा निकम

Post a Comment

0 Comments