मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो,


आपणा सर्वांना मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपले मैत्रीचे नाते असेच पुढे चालत राहो हीच अपेक्षा आहे. या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण मैत्री ही नात्याच्या पलीकडची आहे आणि बाकी सर्व गोष्टीं एक किरकोळ बाब आहे. मित्र काय आपल्यासाठी नेहमीच उभा असणार हा एक निव्वळ समज गैरसमज होत चाललेला आहे.

शाळेतील मैत्री

या दिवसाचे महत्त्व काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे म्हणजे शाळेतील विद्यार्थी दशेत जावे लागेल. तेव्हाची मैत्री खुप खास होतो कारण त्या मैत्रीला स्वार्थ नव्हता आणि होती ती फक्त निरागसता. काय तुम्हाला सुद्धा असे वाटते का ते सांगा?

शाळेतील मैत्री सकाळी बेंच वर बसण्यापासून ते खावूचा डबा उघडला की सगळे एकदम मस्त मग मधल्या सुट्टीत जेवताना एकमेकांच्या डब्यावर ताव मारत जेवायचे आणि आपल्या डब्यातील भाजी मित्राला किंवा मैत्रिणीला हक्काने सांगणे कसे वेगळे वाटायचे. तेव्हाचा तो मैत्रिवराचा हक्क किती लोकांचा असाच अबादित आहे त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा.

आपल्या डब्यात जर आपल्या आवडीची भाजी नसेल तर ती भाजी मित्राला देणे आणि त्याच्या भाजीवर मारणे अगदी सहज आणि सोप्या पद्धती  वाटायच्या. आता सर्व काही बदलले आहे.

कॉलेज मध्ये असतानाची मैत्री

कॉलेज मध्ये असताना सुध्दा चांगले मित्र मिळतात फक्त आपली मैत्रीची व्याख्या काय आहे त्यावर सर्व अवलंबून असते. येथे सगळेच नवीन असतात आणि कदाचित आपले शाळेतील मैत्री वेगळे झाले त्यामुळे नवीन मित्र करण्यावाचून पर्याय नाही. तिथे आणखी नविन मित्र मिळतात आणि मग हा प्रवास सुरू होतो. काहीच्या या आठवणी सुध्दा मजिशिर असतील? कायवमग झाली की नाहीं आपल्या मित्र मैत्रिणीची आठवण.

ऑफिसमधील मैत्री

मैत्रीची व्याख्या आम्ही बदलत नाही परंतु आपणास कोणत्या कोणत्या वळणावर मित्र भेटतात याचे हे सर्व संदर्भ आहेत. पुन्हा येथे सुध्दा आपल्या नवीन मित्राची शोध मोहीम चालू करावी लागते. काहींचे वेगळे अनुभव येथेसुध्दा असतील.

आपली मैत्रीची आठवण

वरील सर्व दश्या बघून तुम्हाला तुमच्या कोणत्या कोणत्या मित्रांची आठवण झाली ते आम्हला नक्की सांगा.

प्रत्येक वेळी आपण सर्वजण आपल्या सर्व मित्रांना भेटू शकत नाही कारण या वेगवेगळ्या दशेत भेटलेले सर्व मित्र कदाचित वेगवेगळ्या भागात असतील पण खरंच आपण सर्वजण आपल्या या मित्रांना आठवतो का? फोन करतो का? मग मैत्री दिवसाच्या निमित्ताने त्यांना एकदातरी फोन करा. मुळात मैत्री ही नात्याच्या पलीकडची आहे आणि त्याला कोणत्या मित्राला फोन किंवा न भेटता मनात, विचारांत राहिली पाहिजे. नाहीतर खऱ्या आयुष्यात एकही मित्र नाहीं परंतु फेसबूक व्हॉट्स ॲपवर हजारो मित्र आणि मग आपल्या सगळ्या प्रकारात शोभून दिसणारा एक मेसेज, पण याला अर्थ खुप मोठा आहे.











आजच्या या दिवसाची आठवण आपण दरदिवशी करायला हवी कारण मैत्रीचे नाते अतूट आहे त्याला सिमा किंवा मर्यादा नसतात. 

आपला,

मी मराठी 

दत्तात्रय कृष्णा निकम 













आपला मैत्री दिनाचा अनुभव कसा होते ते आम्हाला जरूर कळवा. 







Post a Comment

0 Comments