कळवा पॅशन!

 कळवा पॅशन!

परंपरा कळव्याची - अभिमान आपला!

नमस्कार वाचक मंडळी,

कसे आहात ! वाचन चालू आहे की नाही ? जर चालू असेल तर उत्तमच आहे आणि जर चालू नसेल तर एक नवीन ई-बुक पासून  सुरुवात करायला काय हरकत आहे. 

 ई-बुक बद्दल थोडक्यात 

"दत्तात्रय निकम क्रिएशन" च्या सौजन्याने आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन येत आहे आणि आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. त्यामध्ये आपणास नेमके काय आहे ते थोडक्यात सादर करीत आहे. 

एका नवीन विषयाच्या रूपाने आपणासमोर यायचे असे ठरविले आहे.  बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे या काळात बरेच काही नवीन करण्याच्या संधी मला मिळाल्या. यातून नवीन- नवीन लोकांच्या भेटी झाल्या आणि या सर्व व्यक्तिमत्त्वांना भेटून काही नवीन गोष्टी समजल्या आणि आजचा आपला कळवा पॅशन हा विषय लिहावा असे माझ्या मनोमनी ठरवले. 

या विषयाच्या माध्यमातून आम्ही आपणांसमोर कळव्यातील / जनमानसातील पॅशनेट व्यक्तींची माहिती आपणासमोर सादर करणार आहोत. यातून आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकता, त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांनी या कार्यासाठी जी प्रेरणा घेऊन काही सामाजिक, नैसर्गिक उपक्रम घडवले, तसेच वैयक्तिक पद्धतीने आपल्या परिसराचे किंवा एकंदरीत जिल्ह्याचे किंवा राज्याचे किंबहुना आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगामध्ये मोठे केले. यातील माहितीने आपल्या नवीन-नवीन पॅशनेट व्यक्तींपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांच्याबद्दल जाणून घेता येईल म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. 

आमचा हा पहिला प्रयत्न आहे आपले हे ई -बुक प्रकाशित करण्याचा आणि आपण सर्व वाचकांचे शुभ आशीर्वाद आमच्या टीम बरोबर राहुद्या जेणेकरून आम्हाला असे नवीन नवीन विषय आपल्यापर्यंत वाचनासाठी पोहचविता येतील. आमचा हा प्रयत्न आपल्या सर्व वाचकांना आवडेल अशी आशा करतो. 

पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा. 

https://drive.google.com/file/d/1WKclojq4kiN-kjk0ZvVCs1h7Fu3d1sml/view?usp=drive_link

अरेरे ! एक राहून गेले आपले वाचून झाले की आपण हे ई-बुक तुमच्या वाचक मित्रांना पुढे पाठवून द्या ही विनंती. 

हा एक वेगळा विषय आपणासमोर सादर करण्याचा हेतू एकच आहे, यातून काही लोकांना प्रेरणा घेऊन त्यांचे पॅशन जपण्यासाठी काही मदत झाली तर आमचा हेतू साध्य झाला असे मानता येईल.

आपले !

दत्तात्रय निकम क्रिएशन टीम 

Post a Comment

0 Comments